मुंबई: राज्यातील राजकारणात सध्या सुरू असलेल्या भेटीगाठींच्या सपाट्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे. विरोधी पक्षनेते यांनी लागोपाठ घेतलेल्या दोन भेटीनंतर या चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी पक्षाध्यक्ष यांची आज मुंबईतील घरी जाऊन भेट घेतल्यानं उलटसुलट चर्चेत भर पडली आहे.

वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ही भेट झाल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. हे तर्कवितर्क सुरू असतानाच फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. तिथं खडसे यांच्याशी त्यांचं बोलणं झाल्याचं भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे.

वाचा:

या भेटीनंतर आज खडसे यांनी थेट मुंबईत येऊन शरद पवारांची भेट घेतली. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री हे त्यांच्यासोबत होते. खडसे यांनी स्वत: या भेटीबाबत ट्वीट केलं आहे. पवारसाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं खडसे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र, फडणवीस यांच्याशी बोलणं झाल्यानंतर लगेचच खडसे मुंबईत पोहोचल्यानं काहीतरी नक्कीच घडतंय असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाचा:

दरम्यान, फडणवीसांच्या भेटीगाठीवरून शिवसेनेनं विरोधी पक्षावर खोचक टीका केली आहे. ‘लोकशाहीमध्ये संवाद असला पाहिजे. फडणवीस हे सत्ताधारी नेत्यांना भेटत असतील तर ते चांगलंच आहे. विरोधी पक्ष जमिनीवर येत असल्याचं ते लक्षण आहे. एक दिवस फडणवीस मातोश्रीवरही येतील,’ असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here