बैठकीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी बातचीत करताना सरकारवर कोविड मृत्यूची संख्या लपवण्याचा आरोप केला. तसंच कोविड आटोक्यात आल्यानंतर आपल्या स्तरावर कोविडच्या स्थितीचा ऑडिट करण्याच फडणवीस यांनी सांगितलं.
पिक विम्या प्रकरणी राज्य सरकारने टेंडर काढण्यास उशीर केला असा आरोप करत आमच्या काळात आम्ही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळवून दिले असंही फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, संजय राऊत प्रकरणी माध्यमांनी फडणवीस यांना प्रश्न विचारले असता फडणवीस यांनी राऊत यांना जास्त महत्व देण्याची गरज नसल्याचं सांगितलं.
PM केअर फंडातून आलेल्या व्हेंटिलेटरबद्दल फडणवीस यांनी परभणीचे व्हेंटिलेटर हे योग्य पद्धतीने काम करत असल्याचं सांगितलं. मात्र, औरंगाबाद इथल्या एका कंपनीचे व्हेंटिलेटर हे योग्यरित्या काम करत नसल्याचंही त्यांनी मान्य केलं. तर ओमप्रकाश शेटे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालय योग्य पद्धतीने निर्णय घेणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
परभणीच्या कोविड परिस्थितीबद्दल बोलताना फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. परभणी कोविडची परिस्थिती 10 टक्क्यांवर आली. मात्र, ती 5 टक्क्यांवर येणं गरजेचं आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
म्युकरमायकोसिसबद्दल बोलताना डिस्चार्ज झालेल्या रुगणांची ट्रेकिंग करणं आवश्यक आहे, असं केल्यास आपण म्युकरमायकोसिसवर यश मिळवू शकतो असंही फडणवीस यांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times