गडचिरोली: करोना महामारीने दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागालाही कवेत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर करोना लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. मात्र,भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व पहाडी भागातील नागरिकांमध्ये लसीकरणबाबत बरेच गैरसमज असल्याने नागरिक लसीकरणासाठी नकार दर्शवित होते. या बाबीची गांभीर्याने दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मनुज जिंदल, तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासनाने तालुक्यातील पहाडी परिसरातील पाच गावांमध्ये ” राबविले. यासाठी वरिष्ठ अधिकारी पायवाटेने प्रवास करून गावात पोहोचले व नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या शंका दूर केल्या. ( in )

वाचा:

भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसर पहाडीवर व घनदाट जंगलात वसला आहे. या भागात बडा माडिया नागरिकांची वस्ती असून शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी या भागात विशेष परिश्रम घ्यावे लागतील, याची प्रशासनाला जाणीव होती. कोतवाल पदावर कार्यरत बिनगुंडा येथील गाव प्रमुखाच्या मुलाच्या प्रयत्नानंतरही नागरिक लसीकरणासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल, तहसीलदार अनमोल कांबळे यांनी लसीकरण मोहीम चोखपणे राबवण्याचे आव्हान स्वीकारले. निवडणूक बूथच्या धर्तीवर लसीकरण शिबिराचे नियोजन करण्यात आले.

वाचा:

याअंतर्गत शुक्रवार २८ मे पासून प्रत्येक गावात प्रखर जागरूकता मोहीम राबविण्यात आली. प्रशासकीय यंत्रणा आणि परिसरातील प्रभाव असलेल्या व्यक्तींसह जनजागृती करण्यात आली. यामध्ये फोदेवाडा गावात पहिली सभा घेण्यात आली. स्थानिक समस्या जाणून घेत नागरिकांना बोलते करण्यात आले. यानंतर भामरागडमध्ये अतिशय ओळखीचा चेहरा असलेले जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांचा व्हिडीओ दाखविण्यात आला. या क्षेत्रात अजूनही चालू असलेल्या अभिजात द्वंद्वात्मक पद्धतीत, दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सादर झाला. यामध्ये अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जंगलातून पायी प्रवास करावा लागला. प्रत्येक गावात लसीकरण केंद्रे लावण्यात आली. दोन आरोग्य पथकांनी आजूबाजूच्या भागात कोविड लस साठवण आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पल्स पोलिओ कोल्ड बॉक्समध्ये लस घेऊन प्रवास केला. लसीकरण बूथ एजंट ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ग्रामस्थांच्या यादीसह तयार होते. प्रशासनाकडे यापूर्वी उपलब्ध असलेल्या मतदार याद्यांमधून हे काढण्यात आले. जागरूकता मोहीम, कोविड योद्ध्यांचा वैयक्तिक संपर्क, लसीकरणाची पुरेशी यंत्रणा व प्रक्रिया यामुळे संपूर्ण भागात एकाच वेळी लसीकरण करण्यात आले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here