रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी अनिल परब यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत आता काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अधिक माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी समिती नेमून अनिल परब यांच्या साई रिसोर्ट बांधकाम प्रकरणी अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यासंबंधी लेकी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अनिल परब यांच्या या रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर अनिल परब यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानुसार आता चौकशीचे आदेश देण्यात आले असून यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here