राज्यात बाधित मुलांच्या संख्येत वाढ झाली नसल्याचा खुलासा राज्याच्या आरोग्य विभागाने केला असला तरी नगर जिल्ह्यात मात्र मे महिन्यात ही वाढ झाल्याची कबुली जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. मे महिन्यात नगर जिल्ह्यात एकूण करोना रुग्णांच्या तुलनेत १८ वर्षांखालील बाधित मुलांचे प्रमाण ११.५ टक्के होते, असे त्यांनी सांगितले. राज्यात मात्र हे प्रमाण ०.०७ टक्के असल्याचा खुलासा राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केलेला आहे. (The district collector has admitted that it is true that the number of children affected by corona has increased in Ahmednagar)
नगर जिल्ह्यात एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात करोना बाधित मुलांचे प्रमाण वाढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सर्वप्रथम ‘महाराष्ट्र टाइम्स’ने याकडे लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित केले. तिसरी लाट मुलांसाठी घातक ठरणार असल्याचे अंदाज वर्तविले जात असल्याने यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. मात्र, आकडेवारीचे विश्लेषण करून नेमकी माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने प्रसार माध्यमांतून या बातम्या प्रसारित झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल आणि मे महिन्यातील आकडेवारी देऊन १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण वाढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर आरोग्य विभागाने मात्र याचा इन्कार केला. गेल्या सहा महिन्यांत यामध्ये फारसा बदल झाला नसल्याचे डॉ. व्यास यांनी म्हटले आहे. मात्र, नगर जिल्ह्याची त्यांनी जी आकडेवारी दिली, त्यानुसारही नगर जिल्ह्यात तरी हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
आरोग्य विभागाने दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात मार्च २०२१ मध्ये पाच वर्षे वयोगटात १८८ रुग्ण होते, ते एकूण रुग्णांच्या १.०१ टक्के होते. सहा ते दहा वर्षे वयोगटातील २७० रुग्ण, एकूण प्रमाण १.४५ टक्के. अकरा ते अठरा वर्षे वयोगटात ११७३ रुग्ण. एकूणात प्रमाण ६.२८ टक्के. एकूण अठरा वर्षे आतील वयोगटात १६३१ रुग्ण, एकूणात प्रमाण ८.७४ टक्क. करोनाचे एकूण रुग्ण १८ हजार ६६९.
एप्रिल २०२१ मध्ये पाच वर्षे वयोगटात ७५७ रुग्ण. एकूण रुग्णांच्या ०.९८ टक्के. सहा ते दहा वर्षे वयोगटात १५१० रुग्ण. एकूणात प्रमाण १.९५ टक्के. अकरा ते अठरा वर्षे वयोगटात ५३४० रुग्ण. एकूणात प्रमाण ६.९० टक्के. एकूण अठरा वर्षे आतील वयोगटात ७६०७ रुग्ण. एकूणात प्रमाण ९.८३ टक्के. करोनाचे एकूण रुग्ण ७७ हजार ३४४. मे २०२१ मध्ये पाच वर्षे वयोगटात १०७६ रुग्ण. एकूण रुग्णांच्या १.३३ टक्के. सहा ते दहा वर्षे वयोगटात १९१८ रुग्ण. एकूणात प्रमाण २.३७ टक्के. अकरा ते अठरा वर्षे वयोगटात ६४२२ रुग्ण. एकूणात प्रमाण ७.९५ टक्के. एकूण अठरा वर्षे आतील वयोगटात ९४१६ रुग्ण. एकूणात प्रमाण ११.६५ टक्के. करोनाचे एकूण रुग्ण ८० हजार ७८५. म्हणजेच मार्च महिन्यात ८.७४ टक्के, एप्रिल महिन्यात ९.८३ टक्के तर मे महिन्यात हेच प्रमाण ११.६५ टक्के झाल्याचे दिसून येते.
क्लिक करा आणि वाचा-
नगरचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यासंबंधीची जिल्ह्याची आकडेवारी देताना १८ वर्षांखालील रुग्णांचे प्रमाण वाढल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. यासोबतच उपाययोजना हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी १०० बेडचा स्वतंत्र वॉर्ड करण्यात आला असून त्यामध्ये १५ बेडचा आयसीयू आहे. याशिवाय जिल्ह्यातील २५ सरकारी रुग्णलयांतही बालकांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times