भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त झालेले उत्तरच ट्विटच्या माध्यमातून लोकांपुढे ठेवले आहे. सोमेश कोलगे यांनी ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवली होती. आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव कधी पाठवला?, कोणती नावे पाठवली?, काही उत्तर आले का?, असे प्रश्न कोलगे यांनी विचारल्याचे उपाध्ये यांनी नमूद केले आहे. हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले असून आता नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?, असा सवाल केशव उपाध्ये यांनी खासदार संजय राऊत यांना विचारला आहे.
भाजपचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न
जर हा प्रस्ताव विचाराधीन असेल, तर मग काही प्रश्नांचा खुलासा व्हायला हवा, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. जर हा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे, तर मग पूर्वी ठरलेली नावं बदलण्याचा प्रस्ताव आहे का?, तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? आणि मुख्यमंत्री मंत्रालयात जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का?, असे एकावर एक तीन प्रश्न उपाध्ये यांनी सरकारला विचारले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
सरकारने उत्तरात काय म्हटले आहे?
माहिती अधिकार अधिनियमातील कलम ८ (झ)मधील तरतूदीनुसार प्रस्तुत प्रकरण विचाराधीन असल्यामुळे सद्यस्थितीत माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही, असे उत्तर माहिती विचारणाऱ्या सोमेश कोलगे यांना देण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times