: नदीत बुडून मायलेकीसह तिघींचा मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. कपडे धुण्यासाठी काही महिला नदीवर गेल्या होत्या. मात्र यातील चौघी नदीत बुडाल्या. त्यानंतर एकीला वाचवण्यात यश आलं, मात्र तिघींनी आपला जीव गमावला. ही घटना गेवराईत तालुक्यात मिरगाव इथं घडली.

मृत व्यक्तींमध्ये आई, मुलगी आणि पुतणीचा समावेश आहे. शीतल गोडबोले (वय १०) , अर्चना गोडबोले (वय १०) आणि रंजना गोडबोले (वय ३०) अशी मृतांची नावे आहेत. तर आरती गोडबोले या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कपडे धुण्यासाठी महिला नदी आणि ओढ्यावर जात असतात. रंजना गोडबोले यादेखील आपली मुलगी आणि पुतणीसह घरातील कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीवर गेल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील विविध भागात कोसळत असलेला पाऊस या परिसरातही झाला होता. परिणामी नदीची पाणी पातळी वाढली. मात्र या वाढलेल्या पाणी पातळीचा अंदाज रंजना यांना आला नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे.

याबाबतचं वृत्त पसरताच गावावर शोककळा पसरली. महिलेसह दोन लहान मुलींनी जीव गमावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here