करोनामुळे आतापर्यंत एकूण ५ हजार १७२ मुलांनी आपल्या आई-वडिलांपैकी एकाला गमावले आहे. तर एकूण १६२ मुलांनी आपले आई आणि वडिल असे दोघांनाही गमावले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी तसेच उद्योग आणि व्यवसायासाठी मोठे आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
केंद्र सरकारकडूनही मदतीची घोषणा
करोनामुळे ज्या मुलांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आहे अशा मुलासाठी केंद्र सरकारने मोठ्या मदतीची घोषणा केली आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत ही मदत केली जाणार आहे. ज्या मुलाने आपले आई-वडील किंवा त्यांपैकी एकाला गमावले आहे अशा मुलांना त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षी मासिक सहायता रक्कम मिळणार आहे. तसेच त्याच्या वयाच्या २३ व्या वर्षी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपये मिळणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या मदतीबरोबरच अशा अनाथ मुलांना मोफत शिक्षण मिळण्याबाबतही सरकारने योजना आखली आहे. त्याअंतर्गत सरकार मुलांना शिक्षणासाठी कर्ज देणार आहे. विशेष म्हणजे त्या कर्जासाठी केंद्र सरकार त्याचे व्याज पीएम केअर्स फंडातून दिले जाणार आहे. इतकेच नाही, तर अशा मुलांना त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंतचा आरोग्य विमा देखील दिला जाणार आहे. या विम्याचा प्रिमियम देखील पीएम केअर्स फंडातून दिला जाणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times