मुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून दैनंदिन रुग्णसंख्या आजही तुलनेने कमीच राहिली आहे. गेल्या २४ तासांत १५ हजार १६९ नवीन रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी २९ हजार २७० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, मृत्यूंचा आकडा आज २८५ पर्यंत खाली आला असून ही संख्या आणखी कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहे. ( )

वाचा:

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाला. एप्रिल महिन्यात या साथीने राज्यात थैमान घातले होते. दैनंदिन रुग्णसंख्येने ६७ हजारांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर ही लाट हळूहळू ओसरायला लागली आहे. रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहायला मिळाले असले तरी आता दैनंदिन आकडे १५ हजारांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या दोन आठवड्यात ही लाट खऱ्या अर्थाने उतरणीला लागली आहे. राज्यात काल मंगळवारी करोनाचे १४ हजार १२३ रुग्ण आढळले होते. आज त्यात थोडी वाढ झाली. आज १५ हजार १६९ नवीन रुग्णांची भर पडली. महत्त्वाचे म्हणजे राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार २७० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.५४ टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या करोनाचे २ लाख १६ हजार १६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक २७ हजार ९९० रुग्ण जिल्ह्यात आहेत तर जिल्ह्यात १८ हजार ८६२, महापालिका क्षेत्रात १८ हजार ४७८, ठाणे जिल्ह्यात १७ हजार ३४१ तर जिल्ह्यात १६ हजार ९७९ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

वाचा:

अशी आहे करोनाची राज्यातील आजची स्थिती:

– राज्यात आज २८५ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ % एवढा आहे.
– आज राज्यात १५,१६९ नवीन रुग्णांचे निदान.
– आज २९,२७० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ करोनामुक्त.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५४ % एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,७६,१८४ (१६.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here