सोलापूर: करमाळ्याचे यांच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन या कारखान्याने खत देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या नांवे परस्पर कर्ज उचलल्याचे प्रकरण समोर आले असून शेकडो शेतकऱ्यांना मे महिन्यात पुणे- कोथरूड येथील पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतल्याच्या नोटीसा आल्यानंत्तर प्रकरणाला वाचा फुटली आहे. ( factory took loans of rs 22 crore 11 lakh in the name of farmers)

करमाळा तालुक्यातील शेतकरी रणजीत बोगा,अशोक व प्रदीप ढवळे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांना मे महिन्यात पुणे-कोथरूड येथील पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतल्याच्या नोटीसा आल्या आहेत. आमदार शिंदे यांच्या कारखाना व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून २०१३ साली खत देतो म्हणून कागदपत्रे जमा केली. मात्र शेतकऱ्यांना खत न देता त्या कागदपत्रांचा गैरवापर करत पुणे, कोथरूड येथील पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांच्या नावे तब्बल २२ कोटी ११ लाख रुपयांचं कर्ज उचलल्याचे समोर आले आहे, मात्र या शेतकऱ्यांनी कोणत्याच प्रकारे बॅंकेकडून कर्ज घेतले नसताना आलेली नोटीस पाहून शेतकरी चक्रावून गेले.

क्लिक करा आणि वाचा-
याबाबत अधिक माहिती व चौकशी केली असता, आमदार संजय विठ्ठलराव शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव येथील कारखाने २०१३ साली सदरचे कर्ज उचलले असून शेतकऱ्यांच्या परस्पर या या कर्जाचे सन २०१७ मध्ये रिनोवेशन केले आहे. दरम्यान यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांना २९ मे २०१९ रोजी नोटीस आली आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या नावे असलेले कर्ज भरावे अन्यथा फौजदारी कारवाईचा इशारा बॅंकेने दिला आहे. त्यामुळे करमाळ्याचे लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार संजय शिंदे यांनी ही शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. त्यांनी त्वरीत आमचे न काढलेले कर्ज भरुन आम्हाला कायदेशीर कारवाईच्या कचाट्यातुन वाचवावे, अन्यथा आमदार संजय शिंदे यांच्या घरापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा या शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here