कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात करोनाचा कहर सुरू असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील तब्बल १०१ गावांनी करोनाला वेशीबाहेर ठेवण्यात यश मिळवले आहे. याशिवाय गावपातळीवर अतिशय नियोजनपूर्वक प्रयत्न करत ग्रामस्थांनी सातशेपेक्षा अधिक गावं करोनामुक्त केली आहेत. करोनाने रौद्ररूप धारण केले असताना या गावांनी इतरांसमोर नवा आदर्शच ठेवला आहे. (101 villages in South Maharashtra have blocked the corona outside the gates)

दक्षिण महाराष्ट्रातील , सांगली व सातारा या तीन जिल्ह्यात चार लाखावर पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामध्ये दहा हजारावर रुग्णांचा वर्षभरात मृत्यू झाला. इतर सर्व रुग्णांनी करोनावर मात केली. या तीन जिल्ह्यात तीन हजार ३०३ गावे असून यातील बहुतांशी गावात करोनाने प्रवेश केला. यामुळे याची भीती गावागावात निर्माण झाली. करून आला. त्याला रोखण्यासाठी प्रशासकीय व गावपातळीवर अनेक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी दीड महिन्यानंतरही लॉकडाऊन सुरूच आहे.

हे तीन जिल्हे रेडझोन मध्ये आहेत. बरेच प्रयत्न सुरू असले तरीही रोज प्रत्येक जिल्ह्यात एक हजार ते दीड हजार रुग्ण सापडत असल्यामुळे कहर कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. रोज शंभरापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्यामुळे दक्षिण महाराष्ट्रावर भीतीची छाया कायम आहे. अनेक शहरात उपचारासाठी बेड मिळत नाहीत. ऑक्सिजन कमतरता भासत आहे. यामुळे काही ठिकाणी रुग्णांचा तडफडून जीव जात आहे. जिल्हाबंदी सारखे कडक नियम लावूनही रूग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधीही अस्वस्थ झाले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
एकीकडे ही परिस्थिती असली तरी दुसरीकडे मात्र दक्षिण महाराष्ट्रातील १०१ गावांनी करोनाला वेशी बाहेरच ठेवण्यात यश मिळवले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पैकी ६४, सातारा जिल्ह्यातील १४९२ पैकी २७ तर सांगली जिल्ह्यातील ७२० पैकी दहा गावांचा समावेश आहे. आपल्या गावात त्याचा शिरकाव होऊ नये यासाठी गावपातळीवर अतिशय काळजी घेतल्यामुळेच हे शक्य झाले आहे. यापुढेही विशेष काळजी घेत करोनाला रोखण्याचा या गावांनी निर्धारच केला आहे. याशिवाय करोनाचा गावात प्रवेश झाल्यानंतर तातडीने उपाययोजना करत तीन जिल्ह्यातील सातशेपेक्षा अधिक गावे करोनामुक्त झाली आहेत.

आकडेवारी

जिल्हा एकूण रूग्ण, उपचार सुरू , मृत्यू , करोनामुक्त
कोल्हापूर ११६१७२ , १५५७० , ३७९३ , ९६८०९
सांगली १२०२६९, ११००७ , ३४८० , १०५७८२
सातारा १६९३१४, १७५२९, ३७३० , १४८०५२

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here