उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री माजी राज्यसभा खासदार आणि बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या विरोधात अभिनेता रणदीप हुड्डा याने अश्लील व बेताल वक्तव्य केली आहेत. त्याने असे वक्तव्य करून, तसेच ट्विट करून देशातील कोट्यवधी बहुजन समाजाचा अपमान केलेला आहे. हे जातीयवादी तसेच मनुवादी मानसिकता असलेले लोक असून ते आमच्या बहुजन समाजातील महापुरुषांचा देखील वारंवार अपमान करीत आलेले आहेत. हे लक्षात घेत अशा या माथेफिरू रणदीप हुड्डा याच्यावर SC, ST अन्याय व अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखलकरून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करून त्वरित अटक करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष ताजणे यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हुड्डा याच्याविरोधात कारवाई करून त्याला अटक न केल्यास संपूर्ण मुंबई व राज्यात बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशाराही ताजणे यांनी दिला आहे. यामुळे मुंबईसह राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल असे आम्ही आपणास या पत्राद्वारे कळवीत आहोत, असेही ताजणे यांनी पोलिस आयुक्तांना केलेल्या अर्जात नमूद केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times