स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू झाल्यानंतर इथं जन्माचा दाखला आणि इतर पुरावे मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालीय. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात जिथं सामान्यत: महिन्याभरात जन्माचा दाखला मिळवण्यासाठी ६००-७०० अर्ज दाखल होतात, तिथं गेल्या दोन महिन्यांत २० हजारांहून अधिक अर्ज दाखल झालेत. यातील ५० टक्के व्यक्तींचं वय ४०-५० वर्षांदरम्यान आहे. तर वयाची सत्तारी ओलांडलेल्या जवळपास ४०० जणांनीही आपला जन्माचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलेत.
याचा ताण अर्थातच सरकारी यंत्रणेवरही आला आहे. अगोदर जन्माचा दाखला बनवण्यासाठी ७-१० दिवस लागत होते. परंतु, आता हाच दाखला मिळवण्यासाठी २०-२५ दिवसांचा कालावधी लागतो. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अर्जदारांची संख्या वाढली असली तरी कर्मचाऱ्यांची संख्या मात्र तेवढीच आहे. त्यामुळे हा वेळ लागणं साहजिकच आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times