एका महिन्यात ५२५ मुलांवर अशा प्रकारे चाचणी केली जाणार आहे. यातील किमान १०० मुलांनी व्हॉलिंटियर म्हणून नोंदणी केली आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर तीन मुलांवर चाचणी केली गेली. दुसऱ्या टप्प्यात लसीचा मुलांवर कुठलाही साइड इफेक्ट न दिसल्यावर तिसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल आणि त्याचा योग्य प्रभाव दिसून आल्यावर लस मंजुरीसाठी पाठवली जाईल, असं संजीव कुमार म्हणाले.
देशातील अनेक बड्या नेत्यांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुलांसाठी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यामुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून त्यांचा बचाव करता येईल. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं बोललं जात आहे. अमेरिका, कॅनडासह अनेक देशांमध्ये १६ वर्षांवरील युवकांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. जगभरात लहान मुलांसाठी लसीची चाचणी सुरू आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times