वाचा:
मुंबई पालिकेकडे लशींचा पुरेसा साठा नसल्याने गुरुवारी पालिकेसह सरकारी केंद्रांवर लसीकरण होणार नाही. पालिकेकडे उद्या दिवसभरामध्ये लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसा साठा उपलब्ध झाल्यास शुक्रवारपासून पुन्हा लसीकरण नियमितपणे केले जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लसीकरण बंद राहणार असल्याने नागरिकांची जी गैरसोय होणार आहे त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत, असे नमूद करतानाच लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू, असेही पालिकेने नमूद केले आहे.
वाचा:
दरम्यान, राज्याला केंद्राकडून होणारा मर्यादित लस पुठवठा लक्षात घेता १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण आधीच थांबवण्यात आलेले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरळितपणे व्हावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. मात्र, या वयोगटासाठीही लस तुटवडा भासत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईसारख्या शहरातही लसीकरण थांबवावे लागत असल्याने लसीकरणाला वेग कसा येणार तसेच १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण आणखी किती काळ पुढे ढकलले जाणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
मुंबईतील संसर्गाची बुधवारची स्थिती:
२४ तासात बाधित रुग्ण – ९२५
२४ तासात बरे झालेले रुग्ण – १६३२
बरे झालेले एकूण रुग्ण – ६७४२९६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १६५८०
दुपटीचा दर- ४७७ दिवस
वाढीचा दर ( २६ मे ते १ जून)- ०.१४ %
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times