म. टा. विशेष प्रतिनिधी,

करोनाची मुंबईतील दुसरी लाट जवळपास ओसरल्याचे चित्र असून स्थिती झपाट्याने सुधारते आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४५३ दिवसांपलीकडे पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे ९५ टक्क्यांवर आले असून रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ४५३ दिवसांपलीकडे पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९५ टक्क्यांवर गेले आहे. रुग्णवाढीचा दर ०.१५ टक्क्यांवर आला असून उपचाराधीन रुग्णसंख्या १७ हजारापर्यंत खाली आली आहे. मुंबईकरांसाठी ही सकारात्मक बाब आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलमध्ये दररोजच्या रुग्णसंख्येने तब्बल अकरा हजारांचा टप्पा ओलांडल्याने पालिकेची चिंता वाढली होती. ही दुसरी लाट रोखण्यासाठी पालिकेने प्रभावी उपाययोजना केल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आहे. सद्यस्थितीत रुग्णांची दररोजची संख्या ८०० ते बाराशेपर्यंत नोंदवली जात आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून संसर्गाला उतार येत गेला असून रुग्णसंख्या कमी होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. ३० एप्रिल रोजी मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ८८ टक्के होता. ६ मे रोजी हे प्रमाण ९० टक्क्यांवर गेले होते तर बुधवारी दोन जून रोजी हे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

रुग्णवाढीचा दर ३० एप्रिल रोजी ०.७८ टक्के होता. हे प्रमाण ६ मे रोजी ०.५१ टक्क्यांपर्यंत खाली आले तर सुमारे महिनाभरात तीन जून रोजी हे प्रमाण ०.१५ टक्के इतके झाले आहे. मंगळवारी दोन जून रोजी नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. दिवसभरात ८३१ नवीन रुग्णांची नोंद झाली तर पाच हजार ८६८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. विशेष म्हणजे पालिकेने चाचण्यांची संख्या कमी जास्त करूनही रुग्ण संख्येत मोठी वाढ होत नसल्याने मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

२८ मे रोजी ३० हजार, २४ मे रोजी २२ हजार, २१ मे रोजी ३३ हजार, २० मे २९ हजार ५००, १८ मे १८ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. या दिवसात रुग्ण संख्या एक हजार ते पंधराशेपर्यंत कायम राहिल्याने संसर्ग नियंत्रणात असल्याचा निष्कर्ष पालिकेने काढला आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी

परळ ७७३

काळबादेवी ७३१

घाटकोपर ६५५

चेंबूर ६३०

सँडर्हस्ट रोड ५९७

मानखुर्द ५६९

भायखळा ५४४

माटुंगा ५४१

दादर ५२४

मुलुंड ५१७

दहीसर ३११

बोरीवली ३५६

विक्रोळी ३६०

कुलाबा ३७२

अंधेरी पश्चिम ३८४

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here