उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या फोटोंतून केरळच्या तटावर आणि त्याला लागून असलेल्या दक्षिण – पूर्व अरब सागरात ढग पसरलेले दिसून येत आहेत.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये येत्या २४ तासांत स्थिती मान्सूनसाठी अधिक अनुकूल होण्याचा पूर्वानुमान आहे. केरळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडतोय.
तुमच्या राज्यात कधी दाखल होणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून पुढे सरकत इतर राज्यांत या तारखांना दाखल होऊ शकतो…
- : ३ जून
- : ११ जून
- तेलंगणा : ११ जून
- पश्चिम बंगाल : १२ जून
- ओडिशा : १३ जून
- झारखंड : १४ जून
- बिहार आणि छत्तीसगड : १६ जून
- उत्तराखंड – मध्य प्रदेश : २० जून
- उत्तर प्रदेश : २३ जून
- गुजरात : २६ जून
- दिल्ली – हरयाणा : २७ जून
- पंजाब : २८ मे
- राजस्थान : २९ जून
सामान्य राहणार मान्सून
केरळमध्ये सामान्यत: १ जून रोजी मान्सून दाखल होतो. यंदा केरळमध्ये मान्सून वेळेअगोदर म्हणजेच ३१ मे किंवा त्यापूर्वी चार दिवस अगोदरच पोहचण्याचा अंदाज आयएमडीकडून व्यक्त करण्यात आला होता. परंतु केरळमध्ये अद्याप मान्सूनची स्थिती तयार झाली नसल्याचं आयएमडीकडून ३० मे रोजी स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, यंदा मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज आयएमडीनं व्यक्त केला आहे.
दिल्ली – एनसीआर भागात यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पोहचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे, जून महिन्यात उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मोठ्या चांगलाच पाऊस पडू शकतो. गेल्या वर्षी मान्सून ३० सप्टेंबर रोजी गायब झाला होता तर पाऊस २० टक्के कमी पडला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times