टायगर श्रॉफ व दिशा पटानीच्या चित्रपटांच्या शीर्षकांचा वापर पोलिसांच्या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे. ‘करोनाविरुद्ध सध्या ‘वॉर’ सुरू आहे. अशा युद्धाच्या काळात वांद्र्याच्या रस्त्यावर ‘मलंग’गिरी करणे दोन कलाकारांना महागात पडलं आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं कोविड १९ चे नियमांचं उल्लंघन होईल असं काही करू नका. विनाकारण ‘हिरोपंती’ करणं टाळा,’ अशी विनंती पोलिसांनी मुंबईकरांना केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जिमनंतर दिशा आणि टायगर हे लाँग ड्राईव्हचा आनंद घेण्यासाठी वांद्र परिसरात होते. वांद्रे परिसरातच त्यांची गाडी फिरत होती. टायगर मागच्या सीटवर बसला होता तर दिशा ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसली होती. बँडस्टँड येथे पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांनी चौकशी केली असता बाहेर फिरण्याचे कोणतेही ठोस कारण टायगर व दिशाला देता आले नाही. शेवटी पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला.
वाचा:
एप्रिल महिन्याच्या पाच तारखेपासून ते १ जून या काळात मुंबई पोलिसांनी लॉकडाऊन उल्लंघनाचे १९,९६३ गुन्हे दाखल केले आहेत. यातील सर्वाधिक ६,६६४ गुन्हे विनाकारण फिरल्याबद्दल आहेत. मास्क न घालणाऱ्यांवर ४,६०२ व सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याबद्दल १,६४० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे हॉटेल, दुकानदार व वाहने वापरणाऱ्यांवर करण्यात आले आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times