मुंबईः मुंबई पालिकेकडे लशींचा पुरेसा साठा नसल्याने आज पालिकेसह सरकारी केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याची मुंबई महापालिकेनं दिली आहे. यावरुन भाजपनं मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई महानगरपालिकेकडे लशींचा तुटवडा असल्यानं आज जवळपास सर्वच लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद आहे. त्यामुळं आज पुन्हा एकदा लसीकरण मोहिम खोळंबली आहे. यावरुन भाजपनं मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे.

‘मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र थाटात उघडतात, पण लस नाहीत. लसीकरणाचा पुरता बोजवारा उडाला असून नियोजनाचा अभाव जाणवतो. लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता?, लोकांचा व यंत्रणांचा वेळ फुकट का घालवता?,’ असा सवाल भाजपचे नेते यांनी केला आहे.

वाचाः

‘स्वतःचे कौतुक करुन घेत असताना लसीकरणाचे ढिसाळ नियोजन व मुंबईकरांना होत असलेल्या गैरसीयोची जबाबदारी पण मुंबई पालिकेनं घ्यावी,’ असा टीका दरेकर यांनी केली आहे.

दरम्यान, शहरामध्ये लसीकरण मोहीम थंडावली असली, तरीही पालिकेकडून आर्थर रोडमधील १६९ कैद्यांना नुकतीच लस देण्यात आली. त्यासाठी आर्थर रोड तुरुंगात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही ओळखपत्र नसतानाही पालिकेने १६९ कैद्यांना लस देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here