राज्यातील मराठा समाजाला शरद पवार यांच्यामुळंच आरक्षण मिळालं नाही. या सरकारला कुणाला आरक्षण द्यायचंच नाही,’ असा आरोप भाजपचे आमदार यांनी केला आहे. त्याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ‘गोपीचंद पडळकर हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी काही भूमिका मांडली आहे. त्यात तथ्य देखील आहे,’ असं पाटील म्हणाले.
वाचा:
‘मराठा आरक्षणावर जाहीर वादविवाद करण्याची माझी तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मी वाचला आहे. पानापानावर चुका दिसत आहेत, निष्काळजीपणा दिसतो आहे. तेच ओबीसींच्या बाबतीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं वटहुकूम काढून ओबीसींचं राजकीय आरक्षण तात्पुरतं टिकवलं होतं. त्यानंतर आमचं सरकार गेलं. आता वटहुकूमचा कायदा करून ते टिकवायला हवा होता. ते केलं गेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह मागास आयोगाचा आहे. तो स्थापन झालेला नाही. राजकीय आरक्षण का, यामागचा तर्क सर्वोच्च न्यायालयाला हवा आहे, तो दिला जात नाही,’ असा आरोपही पाटील यांनी केला.
भेटीगाठी होत असतात!
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शरद पवारांची भेट, त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या घरी दिलेल्या भेटीमुळं सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याबाबत विचारलं असता, ‘या भेटीगाठी वेगळ्या कारणानं सुरू आहेत. शरद पवार हे आजारी आहेत. त्यांची इच्छाशक्ती मोठी आहे. त्यामुळं ते आजारी असतानाही काम करताहेत. अनेक जण त्यांना भेटून तब्येतीची विचारपूस करत आहेत. देवेंद्र फडणवीसही त्यांची विचारपूस करायला गेले होते,’ असं पाटील म्हणाले. ‘खडसेंच्या घरी दिलेल्या भेटीबद्दल म्हणाल तर त्या घरात भाजपचा खासदार आहे,’ याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times