मुंबई: मुंबईच्या किशोरी पेडणेकर यांच्या ट्विटर हँडलद्वारे एका ट्विटर युजरला देलेल्या उत्तरावरून आता राजकारण तापू लागले आहे. मुंबईकरांना लस उपलब्ध व्हावी यासाठीचे कंत्राट कोणाला दिले आहे?, असा प्रश्न एका ट्विटर युजरने महापौरांना विचारला होता. त्यावर महापौरांच्या हँडलवरून ‘तुझ्या बापाला’ असे उत्तर देण्यात आले होते. या मुद्द्यावरून मनसेचे पदाधिकारी यांनी महापौर पेडणेकर यांना टोला लगावला आहे. ( leader criticizes mayor of mumbai )

महापौर यांना टोला लगावताना संदीप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘आलं अंगावर, ढकल कार्यकर्त्यांवर. यापुढे ‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’.

मुंबईकरांना मुबलक प्रमाणात लस उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढले आहे. त्यावरून एका ट्विट युजरने महापौरांना कंत्राट कोणाला दिले असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्यांच्या ट्विटर हँडलवरून ‘तुझ्या बापाला’ असे उत्तर देण्यात आले. मात्र यावर महापौर पेडणेकर यांनी स्पष्टीकरण देत या मुद्द्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

महापौरांचे स्पष्टीकरण

त्या ट्विटर युजरना दिलेले उत्तर हे आपण दिलेले नसल्याचे महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. जेव्हा अशा प्रकारचे उत्तर दिले तेव्हा माझा मोबाईल माझ्याकडे नव्हता, तर तो एका कार्यकर्त्याच्या हातात होता. त्यावेळी मी वांद्रे येथील बीकेसी येथे एका कार्यक्रमात होते. कंत्राट कोणाला दिले याचे उत्तर त्या कार्यकर्त्याने दिले. अर्थात त्याने दिलेले उत्तर चुकीचे होते. त्या कार्यकर्त्याला मी समजही दिलेली आहे. त्याने केलेले ते ट्विट मी डिलिटही करून टाकले, असे स्पष्टीकरण महापौर पेडेणेकर यांनी दिले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मात्र, असे काही घडले की कार्यकर्त्यांच्या अंगावर टाकून मोकळे व्हायचे, असे सांगत देशपांडे यांनी आता यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी असा टोला महापौर पेडणेकर यांना लगावला.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here