म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः करोनाचा संसर्ग वाढत असला तरी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. कोल्हापुरातील एकशे पाच वर्षीय वयोवृद्ध आजीने करोनावर यशस्वी मात केली आहे. श्रीमती कमलादेवी आप्पासाहेब माने (भिम बहादुर सरकार) असे त्यांचे नाव आहे.

पंधरा दिवसापूर्वी त्यांना तब्येतीचा किरकोळ त्रास जाणवू लागल्यामुळे उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. डॉक्टरांच्या सुचनेनुसार त्यांची करोना चाचणी करण्यात आल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर कोल्हापूरातील ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. करोना उपचारांना त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे त्यातून त्या ठणठणीत बरे झाल्या आहेत.

वाचाः

श्रीमती माने यांना चार मुली, तीन मुले, १६ नातवंडे व २१ परतवंडे असा जंबो परिवार आहे. अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील हे त्यांचे जावई आहेत. तर नातवंडे आमदार आहेत. आजही त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. जुन्या काळातील प्लेगसह इतर साथ रोगाबाबतच्या आठवणी त्या स्पष्टपणे सांगतात. त्यांची प्रकृती ही ठणठणीत आहे. आजही त्या कुटुंबातील सर्वांसाठी मार्गदर्शक आधारवड आहेत.

वाचाः

त्या दररोज वृत्तपत्रांचे वाचन करतात. दररोज चालण्याचा व्यायाम करतात. करोनाला न घाबरता वैद्यकीय उपचारांना योग्य प्रतिसाद व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याच्यावर आपण मात करू शकतो, असा संदेश त्यांनी इतरांना दिला आहे. करोनामुक्त झाल्यानंतर आज रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here