: मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील विविध भागात धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यालाही गुरुवारी पावसाने जोरदार तडाखा दिला. या पावसाने गडहिंग्लज तालुक्यात तिघांचा बळी घेतला आहे.

जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत कडक ऊन होते. त्यानंतर वातावरण ढगाळ झाले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्या. ग्रामीण भागात भिंत खचण्याचे प्रकार घडले.

३ जणांनी गमावला जीव
गडहिंग्लज तालुक्यातील मौजे मुगळी येथे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तीन जण ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नांगणूर (ता. गडहिंग्लज) येथील अजित अर्जुन कांबळे (वय ४८, रा. नांगनूर) त्यांची बहिण गिरीजा व त्यांच्या दुसऱ्या भावाची पत्नी संगीता बसाप्पा कांबळे (वय ४५, रा. नांगनूर) हे तिघेही गिरीजा हिच्या सासूला पाहण्यासाठी हरळी येथे गेले होते.

हे तिघेही गावी परतत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी त्यांनी मुगळीपासून जवळ असलेल्या भीमा शंकर माने यांच्या पोल्ट्रीजवळ आसरा घेतला. यावेळी सुरू झालेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे भिंत कोसळून तिघेही गाडले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानही झालं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here