यावेळी शहराचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून सिटूचे शिष्टमंडळ सोलापूर महानगर पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाताच आंदोलनस्थळी पोलिस प्रशासनाने बळाचा वापर करून २५० विडी व यंत्रमाग कामगारांना जबरदस्तीने ताब्यात घेत त्यांची पोलिस मुख्यालयात रवानगी केली. सुरुवातीला सिटूचे सर्व पदाधिकारी महिला विडी कामगार आणि कार्यकर्ते कोविड-१९ चे सर्व नियम पाळत शांततेत सोलापूर महानगर पालिका मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी दाखल झाले.
त्यानंतर विडी व यंत्रमाग कारखाने सुरू करा, बाजारपेठा सुरू करा अशा मागण्यांचे फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासनाविरुद्धचा आक्रोश व्यक्त केला. त्यावर पोलिस उपायुक्त, सहा.पोलिस उपायुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिसांचा ताफा संपूर्ण आंदोलकांना घेराव घालून आंदोलकांवर दबाव टाकण्यात आला, लाठी उगारत महिला विडी कामगार आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस मुख्यालयात रवानगी केली. त्यानंतर अटकेतील सर्व आंदोलकांची पोलिसांच्या वतीने अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट्स सायंकाळी प्राप्त झाले त्यात २५० पैकी केवळ १ आंदोलकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे करोनाचा प्रभाव ओसरला असतानाही सोलापुरात लॉकडाऊन कशासाठी असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
२४ तासांत लॉकडाऊन न हटवल्यास गनिमी काव्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कॉ.नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिला आहे. यावेळी सिटूचे राज्य महासचिव कॉ.एम.एच.शेख, माकप नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदाताई बल्ला आदींच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times