म. टा वृत्तसेवा, संगमनेर: मुलगा-मुलगीच्या जन्माबाबत वक्तव्य केल्यामुळं वादात अडकलेले लोकप्रिय कीर्तकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थही आता लोक पुढं येऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी आंदोलनं करण्याची चाहत्यांची तयारी सुरू आहे. मात्र, खुद्द इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना त्यापासून रोखलं आहे. आपल्यासाठी कुणीही मोर्चे, आंदोलनं करू नये, असं आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केलं आहे.

वाचा:

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकरांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चहूकडून चौफेर टीका होत आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळं वैतागलेल्या इंदुरीकरांनी नुकतेच सोडून शेती करण्याचे संकेत दिले. त्यांच्या या पवित्र्यामुळं चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून इंदुरीकरांच्या समर्थनाची मोहीमच सुरू झाली आहे. त्यासाठी ‘चलो नगर’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

वाचा:

इंदुरीकर महाराजांनी तात्काळ याची दखल घेत पत्रक काढलं आहे. ‘आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन त्यांनी समर्थकांना केलंय. ‘चलो नगर’ म्हणून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळी माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय शांतताप्रिय आहे. आपणास विनंती आहे की, आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करू नये. अशामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहेत. तरी सर्वानी शांतता राखून सहकार्य करावं,’ अशी विनंती त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here