वडेट्टीवार यांच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच राज्य सरकारकडून याबाबत खुलासा करण्यात आला. यावर वडेट्टीवार यांनी लगेचच घुमजाव करीत, पाच टप्प्यांनुसार निर्बंध शिथिल करण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं सांगितलं. राज्य सरकारच्या या गोंधळावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, यावरुन विरोधी पक्षानंही सरकारला घेरलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी ट्वीट करुन राज्य सरकारवरच्या कारभारावर टीका केली आहे.
वाचाः
फडणवीस यांनी ट्विट करून ‘काय सुरू, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद?’ असे प्रश्न करत राज्य सरकारच्या गोंधळावर खरपूस टीका केली आहे.
तसंच, देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसेनंही राज्य सरकारला टोला लगावला आहे. ‘वडेट्टीवार साहेब तुमच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकतं. काही कळत की नाही तुम्हाला,’ असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times