वाचा:
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे नेते व मंत्र्यांची बैठक आज होत आहे. त्या बैठकीला जाण्यापूर्वी नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते स्वत:च पडेल. हिंमत असेल तर त्यांनी आज निवडणुका घेऊन दाखवाव्यात. जनता कुणाच्या बाजूनं आहे ते कळेल, असं आव्हान फडणवीस यांनी रविवारी भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलताना दिलं होतं. त्याबाबत मलिक यांना विचारलं असता त्यांनी भाजपच्या आव्हानाची खिल्ली उडवली.
वाचा:
वाचा:
‘भाजपच्या लोकांना सत्तेत बसण्याचा आजार झालाय. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत. त्यामुळं त्यांना सतत सत्तेची स्वप्नं पडतात. रात्री ते सत्तेची स्वप्नं बघतात आणि दुसऱ्या दिवशी सरकार पडण्याची वक्तव्यं करत राहतात. हा गंभीर आजार आहे. हा आजार आरोग्यासाठी बरा नाही. भाजपच्या नेत्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,’ असा चिमटा मलिक यांनी काढला.
वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत नेते व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. सरकारमधील कुठल्याही मतभेदावर चर्चेसाठी बैठक बोलावलेली नाही,’ असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times