मुंबईः मुंबईतील ओशिवरा येथील एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळी आठच्या दरम्यान इमारतीला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली असून ६ आगीचे बंब आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. इमारतीला लागलेली आग ही लेव्हल-२ ची असल्याचं समजतं. आगीमुळं आजूबाजूच्या परिसरात धुरांचे लोट पसरले होते. त्यामुळं नागरिकांमध्ये काही वेळासाठी भीतीचे वातावरण पसरले होते.
वाचाः
ओशिवरा परिसरात असलेल्या आशियाना या निवासी इमारतीत सकाळच्या सुमारास आग लागली आहे. ही आग कशी लागली व आगीत नेमकं कोणी अडकलं आहे का याबाबत अद्याप स्पष्ट झालं नाहीये. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. सहा अग्निशमन बंब व रुग्णवाहिका त्यांच्यासोबत होती. त्यांनी लगेचच बचावकार्य हाती घेतलं आहे.
वाचाः
वाचाः
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times