गडचिरोली: जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना आता ‘म्युकरमायकोसीस’ या आजाराने डोके वर काढले असून ‘म्युकरमायकोसीस’ने
दोघांचा बळी घेतला आहे. या आजाराचे जिल्ह्यात सात रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या आजाराने बळी घेतलेल्या रुग्णांमध्ये कोरची येथील ५० वर्षीय पुरुष व चामोशी तालुक्यातील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

करोना झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसीस’ या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अद्यापपर्यंत या आजाराचे सक्रिय रुग्ण नव्हते. मात्र, दोन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने तात्काळ खबरदारी घेत या रुग्णांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७ रुग्णांचे निदान झाले आहे.

वाचाः

म्युकरमायकोसीस या आजाराचे निदान वेळेत झाल्यास रुग्ण गंभीर स्थितीमध्ये न जाता त्याचा आजार बरा होतो,असे राज्यात दिसून आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा म्युकरमायकोसीसबाबत मार्गदर्शक तत्वे ही देण्यात आली आहेत. म्युकरमायकोसीस या आजाराला काळी बुरशी असेही म्हटले जाते. हा बुरशीजन्य आजार असून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणात कमी झाल्यामुळे होतो असे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.

एकाने केली ‘म्युकरमायकोसीस’वर मात

जिल्ह्यातील संशयित म्युकरमायकोसीसचे चार रुग्ण नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. तसेच इतर तीन जण चंद्रपूर येथे उपचार घेत होते. त्यांची तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर त्या-त्या ठिकाणी उपचार सुरू होते. त्यातील गडचिरोली शहरातील ५८ वर्षीय एक जणांने म्युकरमायकोसीसवर मात केली. दोघांवर चंद्रपूर येथे उपचार सुरू असून दोन जण नागपूर येथे उपचार घेत आहेत.

७२३ जणांचा मृत्यू तर, ५८७ सक्रिय करोनाबधितांवर उपचार सुरू

गडचिरोली जिल्हयात काल ३ जून रोजी ३८ नवीन करोना बाधित आढळून आले. तसेच १४१ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित २९, ५०३पैकी करोनामुक्त झालेली संख्या २८, १९३ वर पोहचली. तसेच सध्या ५८७ सक्रिय करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण ७२३ जणांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद आहे. काल १ नवीन मृत्यूमध्ये ८० वर्षीय महिला कमलापूर ता.अहेरी यांचा समावेश असून यामूळे जिल्हयातील करोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १.९९ टक्के तर मृत्यू दर २.४५ टक्के झाला.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here