अकोला: शहरालगत असलेल्या राजे लक्ष्मण सिंह भोसला काॅलेज ऑफ फार्मसी येथील महाविद्यालय प्रशासनाने सुमारे ४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शुल्क न भरल्याने जाणीवपूर्वक परीक्षा फाॅर्म भरण्यापासून वंचित ठेवल्याची तक्रार प्राप्त होताच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उपसचिवांनी भोसला फार्मसी काॅलेजला विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याप्रकरणी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा:

राजे लक्ष्मण सिंह भोसला काॅलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात ‘डी फार्म’चे शिक्षण घेत असलेल्या प्रथम व द्वितीय वर्षातील ४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शुल्क न भरल्याच्या कारणाने परीक्षेचे फाॅर्म भरण्यास मनाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ४ मे २०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार शैक्षणिक शुल्काच्या कारणास्तव कुठल्याही महाविद्यालयाने परीक्षा फाॅर्म न भरून घेता नुकसान केल्यास संबंधित संस्थेचे अध्यक्ष जबाबदार राहणार असल्याचे सांगितले आहे. या आदेशाला झुगारून भोसला फार्मसी काॅलेजच्या अध्यक्षा इंदिरा राजीव भोसले यांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष राहुल इंगोले यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या नागपूर उपसचिवांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपसचिव यांनी भोसला फार्मसी काॅलेजच्या प्रशासनाला खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सबंधित ४५ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विलंब शुल्कासह कार्यालयात सादर करण्यात यावे. संबंधित विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिल्यास महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या नियमानुसार आपल्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील मानकर यांनी दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here