नागपूर : मराठा आरक्षणावरून आता राज्यात राजकारण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे संभाजीराजे भोसेल रायगडावरून आपली भूमिका स्पष्ट करणार असं सांगत आहेत तर दुसरीकडे उद्या बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यायचं नाही आहे. कायदा करण्याचा अधिकार हा राज्याचा आहे. पण तरीदेखील समन्वय नसल्यामुळे आरक्षणावर तोडगा निघत नाही. यातही मागासवर्ग आयोजन हे सरकारला उशिरा आलेलं शहाणपण आहे. आताही सरकारला आरक्षण देता येईल. त्यामुळे आता काम वेगाने करण्याची आवश्यकता असल्याचं फडणवीस म्हणाले. रम्यान, इतकंच नाहीतर यावेळी बोलताना फडणवीसांनी सरकारच्या अनलॉकच्या गोंधळावरही टीका केली आहे.

अनलॉकच्या गोंधळावर टीका
या सरकारमध्ये झालेला हा काही पहिला घोळ नाही. याआधीही असे अनेक प्रकार समोर आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी घोषणा देण्याची गरज आहे. पण बाकीचेच येऊन माहिती देत असल्याचं फडणवीस म्हणाले. इतकंच नाहीतर एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपरमंत्री आहे. मविआ सरकारमध्ये ही स्थिती असून अनेक मंत्री आपल्यालाच मुख्यमंत्री समजतात. यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावण्याची गरज असल्याची सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here