ठाणेः ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या करोनाकेंद्रात अभिनेत्री मीरा चोप्रा या अभिनेत्रीने आरोग्य कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून लसीकरण केले होते. यानंतर ‘भाभीजी घर पर’ है या टीव्ही मालिकेतील अभिनेत्री सौम्या टंडनचंही नाव समोर येत आहे. यावर अभिनेत्री सौम्या टंडननं स्पष्टीकरण दिलं आहे.

ठाण्यातील करोनाकेंद्रात सौम्या टंडननं लसीकरणासाठी बनावट ओळखपत्र तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. तसंच, एका ओळखपत्रावर तिचा फोटो असल्याचंही बोललं जात असून ओळखपत्रात सौम्या आरोग्य कर्मचारी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, सौम्यानं हे आरोप फेटाळले असून तिनं एका इन्स्टाग्राम पोस्ट करत आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. मी बनावट ओळखपत्र तयार करुन करोना लसीचा पहिला डोस घेतला हे वृत्त चुकीचं आहे. मी माझ्या घराजवळच्या कोव्हिड सेंटरमधून पहिला डोस घेतला होता आणि त्यासाठी सर्व नियमांचे पालन केले होते, असं सौम्या टंडननं म्हटलं आहे.

वाचाः

कोण आहे सौम्या?

२०१५ पासून ‘भाभीजी घर पर हैं’ या टीव्ही मालिकेत सुरुवातीपासूनच अनीता भाभीची भूमिका साकारत होती. या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. परंतु, तिनं ऑगस्ट, २०२० मध्ये मालिकेतून काढता पाय घेतला होता. सौम्यानं ‘ऐसा देस है मेरा’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

वाचाः

लसीकरणासाठी २१ जणांचे बनावट ओळखपत्र

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या करोनाकेंद्रात अभिनेत्री मीरा चोप्रा या अभिनेत्रीने आरोग्य कर्मचारी असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून लसीकरण केले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर ठाणे महापालिकेकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीला २१ जणांचे बनावट ओळखपत्र मिळाले आहेत. त्यापैकी १५ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १९ जणांचे सुपरवायझर तर २ जणांचे अटेंडंट असल्याचे ओळखपत्राचा यामध्ये समावेश आहे.

वाचाः

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद असतानाही खोट्या ओळखपत्रांच्या साहाय्याने हे लसीकरण होत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी ही मंडळी आरोग्यसेवक असल्याचे स्पष्ट केले जात होते. ओम साई आरोग्य सेवा या महापालिकेस मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ही ओळखपत्र दिली जात होती. त्यामुळे या प्रकरणी चौकशी समिती नेमका कोणता अहवाल सादर करते, त्यावर कारवाईची दिशा ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here