वाशिम: दारुडे, अस्वच्छता पसरवणारे या गावात जरा सावधानतेनेच वागतात. गावकऱ्यांची चुक झाली लगेचच तिसऱ्या डोळ्याच्या नजरेत पकडले जातात. ही कोणत्याही नगर पालिका किवा मेट्रो शहराची गोष्ट नसून वाशीम जिल्ह्यातील बाराशे लोकवस्तीच्या तपोवन गावातील चित्र आहे.

गाव कोणतही असले तरी त्या ठिकाणी काही विघ्नसंतोषी लोक असतातच असेच दारुड्यांचा त्रास तपोवन येथील नागरिकांना होत होता. गावात येणारा एकच रस्ता असल्यामुळे त्या रस्त्याने येजा करणाऱ्यांना त्रास होत होता. त्यातून वाद होत होते सोबतच या रस्तावर घाणही होत होती यावर अनेक वेळा समज देण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवस गेले की परत रस्त्यांवर घाण जमा होत होती त्यामुळे अंतिम पर्याय म्हणून सरपंचानी गावात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आणि गावात दहा ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

वाचाः

त्यामुळे येथील दारुडे व रस्त्यांवर घाण करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसला आहे. सोबतच वादही संपुष्टात आले आहेत. तर काही कॅमेरे प्राथमिक शाळेत बसवण्यात आले आहेत. त्याचा पालकांना दुहेरी फायदा झाला आहे. या कॅमेऱ्यांमुळे वाद कमी झाले असून मुले शाळेत कसे शिक्षण घेतात हे त्यांना कळू लागल आहे.

वाचाः

या सर्व कॅमेरासाठी दोन डीव्हीआर दोन मोनिटरवरून नियंत्रण ठेवले जाते. या सर्व यंत्रणेसाठी ७० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. लोकहिताचे निर्णय घेतले तर त्याचा कमी खर्चात उपाय योजना कशा प्रभावी ठरतात त्याच हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. विशेषतः वाशिम जिल्ह्यातील एकमेव आणि पहिली ग्रामपंचायत आहे ज्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here