म. टा. प्रतिनिधी ।

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून बालेवाडी येथील किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्प येथील पाच खोल्यांमध्ये घरफोडी करून ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर,सदाशिव पेठेत बंद फ्लॅट फोडून ६५ हजार रूपयांचा ऐवज चोरल्याचे समोर आले आहे. (Burglary at In )

याबाबत मोहम्मद आलाम (वय २५, रा. किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईट, बालेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथे किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी त्या ठिकाणीच तयार केलेल्या खोल्यांमध्ये सोय करण्यात आली आहे. एका खोलीत दोन कामगार राहतात. गुरूवारी सकाळी सात वाजता नेहमी प्रमाणे सर्व कामगार कामावर गेले. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी तक्रारदार यांच्यासह पाच खोल्यांचे कुलुप उचकटून खोल्यात प्रवेश केला. या पाच खोल्यात राहणाऱ्या दहा हजार रूपयांची रोकड चोरून नेली. संजय आलमच्या यांचे पाच हजार, आफताब आलाम यांचे तीन हजार, मिनाज यांचे पाच हजार मोहम्मद जाफर यांचे तीन हजार, मोहंमद जहीर, आकीम आलम, जावेद आलम, अब्दुल बारी, सुनिल कुमार या सर्वांचे मिळून ३६ हजार रूपये चोरून नेले. सर्व कामगार दुपारी बाराच्या सुमारास कामावरून आल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे चोरून नेल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हे सर्व कामगार बाहेरील राज्यातील आहेत. करोनाच्या महामारीत देखील गावापासून दूर बांधकाम साईटवर पैशासाठी काम करत आहेत. त्यांचे पैसे चोरून नेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाचा:

सदाशिव पेठेतील १६०३ येथे राहणाऱ्या अलकनंदा अशोक वाडेकर (७२) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साठ हजार रूपये रोख आणि सोन्याचे दागिने असा ६५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तक्रारदार या १४ एप्रलिला घर बंद करून नातेवाईकाकडे गेल्या होत्या. दोन जून रोजी घरी आल्यानंतर त्यांना हा घरफोडीचा प्रकार झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here