मुंबई: करोनाच्या लसीकरणासाटी मुंबई महानगरपालिकेने काढलेले अखेर रद्द करण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या ९ कंपन्यांपैकी एक कंपनी पात्र ठरू शकली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता महापालिकेला नव्याने ग्लोबल टेंडर काढावे लागणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. ( global tender for vaccination canceled due to disqualification of all companies)

मुंबईत ज्या वेगाने होणे गरजेचे होते त्या वेगाने होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई महापालिकेने लशींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईतील लसीकरणाचा वेग वाढवता येईल असा पालिकेचा प्रयत्न होता. महापालिकाने तयार केलेल्या अटी आणि शर्थी लक्षात घेता कोणतीही कंपनी पात्र ठरली नाहीत. परिणामी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया रद्द झाली.

मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरद्वारे १ कोटी लशीचे डोस उपलब्ध करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे या नविदा प्रक्रियेमध्ये कोणत्याही लस उत्पादक कंपनीने भाग घेतला नव्हता. सुरुवातीला फायझर अस्ट्रॅझेनेका या लस पुरवठादार कंपनीने यात भाग घेतला होता. मात्र नंतर कंपनीने माघार घेतली.

क्लिक करा आणि वाचा-
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता नव्याने ग्लोबल टेंडर काढणार आहे. या प्रक्रियेत लस उत्पादक कंपन्यांनी भाग घ्यावा असा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. मात्र नवे ग्लोबल टेंडर काढताना महापालिका अटी आणि शर्थी त्याच कायम ठेवणार आहे की त्यात बदल करणार याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. मुंबईत मोठ्या प्रमाणावर आणि जलदगतीने लसीकरण करण्याची मुंबई महापालिकेची महत्वाकांक्षा असून त्यादृष्टीने महापालिकेला आता पावलं उचलावी लागणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यात करोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असून त्यासाठी दोन हात करण्याचा किंवा तिला तोंड देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. असे असले तरी करोनाविरुद्धच्या लढाईत इतर प्रयत्नांबरोबरच लसीकरण हे फार मोठे हत्यार असून त्यासाठी आता महापालिका जोमाने काम करणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here