नवी दिल्लीः पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ या लसीचेही उत्पादन करणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही मंजुरी दिली आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारकडे स्पुतनिक लसीच्या उत्पादनाची मागणी केली होती.

ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने सीरम इन्स्टिट्यूटला स्पुतनिक व्ही ( vaccine ) लसीचे उत्पादन करण्याची मंजुरी दिली आहे. तसंच पुण्यातील हडपसर येथील सीरमच्या प्लांटकडे अधिकृत परवाना असल्याने स्पुतनिक व्हीच्या परीक्षण आणि विश्लेषणासाठी मंजुरी दिली गेली आहे, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

सीरमने केली होती स्पुतनिक लसीच्या उत्पादनाची मागणी

रशियाच्या स्पुतनिक व्ही या लसीचे उत्पादन करण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने दर्शवली होती. यासाठी सीरमने ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) लसीच्या चाचणीसाठी परवाना देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. स्पुतनिक व्हीच्या टेस्ट अॅनालिसिस आणि टेस्टिंगसाठी सीरमने ही मंजुरी मागितली होती. रशियाची स्पुतनिक व्ही या लसीचे उत्पादन भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडूनही करण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here