वाचा:
कोलबाड रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीमध्ये ही ७५ वर्षीय वृद्ध महिला राहत असून शुक्रवारी सकाळी त्या भाजी घेऊन घरी निघाल्या होत्या. सकाळी ९.५० वाजता राहत्या इमारतीच्या लिफ्टजवळ आल्यानंतर त्यांच्या मागोमाग आलेल्या (३०) याने मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या हातातील भाजीच्या दोन्ही पिशव्या लिफ्टमध्ये ठेवल्या. त्यानंतर अमितने खिशातून मिरची पूड काढत ती वृद्धेच्या डोळ्यात टाकली व तिच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी खेचली. परंतु, नागरिकांनीच अमितला पकडून बेदम चोप दिला.
वाचा:
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेत अमित कदम याला ताब्यात घेतले आहे. अमितला अटक करण्यात आल्याचे राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. त्याच्याकडून चोरलेली सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. अमित ठाण्यातील शास्त्रीनगर परिसरात राहत असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी आणखीन काही गुन्हे दाखल आहेत का?, याबाबत राबोडी पोलिस चौकशी करीत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times