नवी दिल्लीः देश अजूनही करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दिलासादायक बाब म्हणजे करोनाची ही दुसरी लाट ओसरत आहे. अशातच आता नीती आयोगाच्या सदस्याने तिसऱ्या लाटेचा इशारा ( ) दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत करोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरवात होऊ शकते, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत म्हणाले. या लाटेपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण ( ), असं त्यांनी स्पष्ट केलं.

भारताने करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना अतिशय चांगल्या प्रकारे ( ) केला आहे. यामुळे करोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारीही तेवढीच उत्तम झाली पाहिजे. या लाटेत युवकांना संसर्गाचा धोका अधिक आहे, असं सारस्वत म्हणाले.

देशातील महामारी तज्ज्ञांनी अतिशय स्पष्ट संकेत दिले आहेत. अपरिहार्य आहे. ही लाट सप्टेंबर ते ऑक्टोबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे. यामुळे देशात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आपण बऱ्याच अंशी चांगलं काम केलं आहे. आपण करोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना केला आहे. यामुळेच आता रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं ते म्हणाले.

आपण शास्त्रज्ञांच्या आणि उद्योगांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बँक, ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी उद्योग उभे करून महामारीचा यशस्वीपणे सामना केला. रेल्वे, विमानतळं, लिक्वीड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी सैन्य दलांचा उपयोग केला जात आहे, असं त्यांनी सांगितलं. करोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशातील व्यवस्थाप चांगले होते. यामुळेच दुसऱ्या लाटेला लवकर नियंत्रित करण्याचा विश्वास आपल्याला मिळाला. दुसऱ्या लाटेतही करोना व्यवस्थापन म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन चांगले होते, असं त्यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here