उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर अजित पवार यांनी राणे यांच्याबाबत प्रतिप्रश्न विचारला. अजित पवार म्हणाले, ‘नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी का नाही दिले आरक्षण?, ही काय पद्धत झाली का?… हे इतक्या वेळा मुख्यमंत्री होते, ते इतक्या वेळी मुख्यमंत्री होते. इतर वेळी म्हणायचे की शरद पवार आमचे नेते आहेत. शरद पवार यांचे वाकून दर्शन घ्यायचे आणि नंतर आपण काहीतरी वेगळे सांगतोय असे करून शरद पवार यांच्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करायचे.’
क्लिक करा आणि वाचा-
शरद पवार हे गेली ५० वर्षे राजकीय जीवनात काम करत असून त्यांनी नेहमीच सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. आताही शरद पवार यांची भूमिका तीच आहे. पक्षाचीही भूमिका तीच आहे की इतर समाजाच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. तशा प्रकारचा प्रयत्नही शेवटपर्यंत झाला, असे सांगताना मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. नारायण राणेंना समजत नाही का, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
पुढे सांगताना ते म्हणाले की, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना उलट मीच पृथ्वीराज चव्हाण यांना शिफारस केली होती की, यामध्ये नारायण राणे यांना प्रमुख नेमा आणि त्यांना यामध्ये लक्ष घालण्यास सांगा.’
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times