नागपूर: नॉन रुग्णांसाठी सर्जिकल काँम्प्लेक्स खुले करण्यास प्रशासन तयार झाल्याने गेल्या चार दिवसांपासून उपोषणावर बसलेले निवासी डॉक्टर शुक्रवारी सायंकाळी कर्तव्यावर परतले. व रुग्णालयातील () निवासी डॉक्टरांनी गेल्या चार दिवसांपासून हा संप पुकारला होता. त्यामुळे मेयोतील वैद्यकीय सेवा विस्कळित झाली होती. ( )

वाचा:

निवासी डॉक्टर कर्तव्यावर परतल्याने रुग्णांना मात्र दिलासा मिळणार असून खोळंबलेल्या शल्यक्रिया मार्गी लागणार आहेत. नॉन कोव्हिड रुग्णांसाठी सर्जिकल काँम्प्लेक्स खुले करा, कोव्हिड न झालेल्या रुग्णांची सोय करा आणि आमच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग मोकळा करा, अशा मागण्या या डॉक्टरांनी लावून धरल्या होत्या.

वाचा:

गेल्या चार दिवसांपासून मेयोतील १५० डॉक्टर प्रशासनाविरोधात तंबू ठोकून उपोषणाने बसले होते. मार्डच्या संपाची कोंडी फुटत नसल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक यांनी गुरुवारी रात्री मार्डच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करीत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र तरीही शुक्रवारी दुपारपर्यंत मार्डचे आंदोलन सुरू होते. या घडामोडीत सायंकाळी त्यांच्या मागण्या मान्य करीत प्रशासनाने सर्जिकल कॉँम्प्लेक्स खाली करून देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे सायंकाळी मार्डचे निवासी डॉक्टर तातडीने कर्तव्यावर रुजू झाले.

या संदर्भात मार्डची भूमिका जाणून घेण्यासाठी डॉ. गणेश पारवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील मार्डने संप मागे घेतला आहे व सर्व निवासी डॉक्टर कर्तव्यावर रुजू झाल्याचे सांगितले. मार्डच्या मागण्या रास्त होत्या. त्या मान्य झाल्या. त्यामुळे आम्ही कर्तव्यावर रुजू झालो, असेही डॉ. पारवे यांनी स्पष्ट केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here