नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी देशातील करोनाविरोधी लसीकरण मोहीमेचा शुक्रवारी आढावा ( ) घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी लसीच्या अपव्ययावर चिंता ( ) व्यक्त केली. लस उत्पादनासाठी कंपन्यांना करण्यात येत असलेल्या मदतीसाठी प्रयत्नांची माहिती पंतप्रधान मोदींना ( ) दिली गेली.

लस उत्पादन कंपन्यांना युनिट्स वाढवण्यासह आर्थिक पाठबळ आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सरकार मदत करत आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांमधील लसीच्या अपव्ययाचा ( ) आढावा घेतला. राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अजूनही खूप आहे अशी चिंता व्यक्त करत ते कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

लसींची उपलब्धता आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठीच्या ‘रोडमॅप’ची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. लसींच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी वेगवगेळ्या लस उत्पादकांना मदत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. भारत सरकार लस उत्पादक कंपन्यांसोबत मिळून काम करत आहे. लस उत्पादनासाठी कंपन्यांनी आणखी प्लांट उभारण्यासाठी, कच्च्या मालाचा पुरवठा आणि आर्थिक पाठबळ देत आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.

देशातील ४५ वर्षांवरील आणि १८ ते ४४ वर्षांदरम्यानचे नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना देण्यात येत असलेल्या लसीकरणाचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. लसीकरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिल्याचं पीएमओने म्हटलं.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल, माहीत आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते, अशी माहिती पीएमओने दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here