मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून एक दिवसआड इंधन दरवाढ केली जात आहे. आज शनिवारी कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवले. मात्र मागील महिनाभर सुरु असलेल्या या दरवाढीने ग्राहक आणि मालवाहतूकदारांचे कंबरडे मोडले. पेट्रोलने जवळपास सहा राज्यांमध्ये १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे.

आज शनिवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १००.९८ रुपयांवर कायम आहे. आज दिल्लीत पेट्रोल ९४.७६ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९६.२३ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९४.७६ रुपये झाला आहे. काल शुक्रवारी देशभरात पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल २८ पैशांनी महागले होते.

मुंबईत आजचा एक लीटर ९२.९९ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८५.६६ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ९०.३८ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८८.५१ रुपये प्रती लीटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १०२.८९ रुपये असून डिझेल ९४.१९ रुपये झाले आहे.

जागतिक बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.५८ डॉलरने वधारला आणि तो ७१.८९ डॉलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.८१ डॉलरने वधारून ६९.६२ डॉलर झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचे दर गुरुवारी बाजार बंद होताना काहीसे ०.०६ टक्क्यांनी कमी होऊन ते ६८.८ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. भारत आणि ब्राझीलमधील कोव्हिड-१९ संक्रमितांच्या वाढत्या संख्येने मागणी वाढीचा आशावाद कमी केला. तसेच अमेरिकी क्रूड साठ्यात घट झाल्याने तेलाच्या दरांबाबत खबरदारी घेतली गेली.

एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकी क्रूड साठ्यात मागील आठवड्यात ५.१ दशलक्ष बॅरलची घट झाली. ही घट २.४ दशलक्ष डॉलर होईल, असा बाजाराचा अंदाज होता. या आठवड्याच्या सुरुवातीला, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज आणि सदस्य राष्ट्रांनी उत्पादन कपात कमी करण्यावर सहमती दर्शवली. कारण येत्या काही महिन्यांत जागतिक मागणी वाढल्याने पुवठ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.

या सहा राज्यात पेट्रोल शंभरीपर
गेल्या महिन्यात झालेल्या १८ वेळा दरवाढीनंतर पेट्रोल ४.३६ रुपये आणि डिझेल ४.९३ रुपयांनी महागले आहे. राजस्थान , मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लेह या ठिकाणी पेट्रोलचा भाव १०० रुपयावर गेले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here