बीजिंग: चीनमध्ये करोना विषाणूचा उद्रेक सुरूच आहे. करोनामुळे चीनमध्ये मृत्यूंचे थैमान सुरू असून आतापर्यंत १७७५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील हुबेई प्रांतात करोनाचा कहर अजूनही सुरू आहे.

करोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, करोनामुळे चीनमध्ये रविवारपर्यंत १७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनाचा संसर्ग झालेले २०४८ नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी १९३३ हे रुग्ण फक्त एकाच हुबेई प्रांतातील आहे. आतापर्यंत चीनमध्ये ७० हजार ५४८ जणांचा करोनाचा संसर्ग झाला आहे.

वाचा: वाचा:

हुबेई प्रातांत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नवे निर्देश जारी केले आहेत. सर्वच प्रकारच्या खासगी वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हुबेई प्रातांतील वुहान शहरात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. चीनमध्ये करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे जगभरात काळजी व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथकही चीनमध्ये दाखल झाले आहे. हे पथक चीनमधील आरोग्य विभागाला करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत करत आहे. दरम्यान, चीनकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू आहे. तर, चीनमधून करोनाचा संसर्ग आपल्या देशात येऊ नये यासाठी इतर देशही खबरदारीचा उपाय आखत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here