अंगावर गरम डांबर ओतल्यामुळे श्वानाला खूप त्रास होत होता. इतकंच नाहीतर श्वान पानटपरी मागे ठेवलेल्या कडप्याला पूर्ण चिकटली होती. स्थानीक नागरिकांनी तिला ओढून बाहेर काढलं अशीही माहिती देण्यात आली आहे. या क्रुरतेच्या घटनेमुळे खरंच माणसात माणुसपण आणि वेदना शिल्लक राहिल्या का? असा प्रश्न समोर येतो.
मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी शहरातील जखमी-बेवारस प्राण्यांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या वसा संस्थेच्या रेस्क्यू हेल्पलाईनवर याबाबत बाळासाहेब विघे यांनी माहिती दिली. तात्काळ वसा रेस्क्यू टीमचे सहाय्यक पशु चिकित्सक शुभम सायंके, गणेश अकर्ते अनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके, अंकुश लोणारे आणि प्रसन्ना यांनी येऊन त्या बेवारस मादी श्वानाचा रेस्क्यू केला.
तिच्या अंगावर डांबर टाकल्याचे लक्ष्यात आल्यानंतर उपचाराला तिथेच सुरुवात करण्यात आली. डांबर गरम असल्याने तिची त्वचा भाजली आहे आणि तिला विशेष काळजीची गरज आहे. त्यामुळे ती बरी होई स्तोवर तिची काळजी आम्ही वसामध्ये घेत आहोत अशी माहिती वसाचे भूषण सायंके यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times