मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेले लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवण्यात येणार आहे. () संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या निकषावर अनलॉक करण्यात येणार आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असलेली मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरू होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, लोकल ट्रेनसाठी मुंबईकरांना आणखी काही दिवस थांबावे लागणार असल्याचं चित्र आहे. ()

वाचा:

राज्य सरकारच्या अनलॉकच्या आदेशानुसार, करोना संसर्गाचा दर ५ टक्क्यांपर्यंत आणि ७५ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन बेड रिकामे असलेले जिल्हे निर्बंधमुक्त होणार आहेत. याच जिल्ह्यात रेल्वे सेवा सुरू होऊ शकणार आहे. मुंबईतील करोना संसर्गाचा मागील काही आठवड्यात दर साडेपाच टक्क्यांपर्यंत आहे. तर, मुंबईत अजूनही ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले आहेत. टप्पेनिहाय विचार करता मुंबई व ठाणे हे जिल्हे तिसऱ्या गटात येतात. त्यामुळं लोकल ट्रेन सुरू होण्यासाठी मुंबई व ठाणेकरांना वाट पाहावी लागणार आहे. त्या-त्या वेळी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईतील निर्बंध शिथील झाले तरी लोकल ट्रेन पूर्ण क्षमतेने सुरू होईल का, याबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही.

वाचा:

मागील वर्षीच्या अनुभवावरून लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत प्रशासन अधिक सावध आहे. मागील वर्षी निर्बंधांसह लोकल सुरू केल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. शिवाय विनामास्क प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे होते. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी आधीच तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं लोकल ट्रेनबाबत राज्य सरकार यावेळी कुठलाही धोका पत्करण्याची शक्यता कमी आहे.

करोना रुग्ण बरे होण्याचा मुंबईतील दर ९५ टक्क्यांवर पोहोचला असला तरी आजही रुग्णवाढ जवळपास हजारांच्या घरात आहे. शुक्रवारी मुंबईत ९७३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या मुंबईत १६,३४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here