मुंबई : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सोहळ आजही चर्चेचा विषय आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वेबिनारमध्ये भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणं हा निर्णय चुकीचा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीमुळे माझ्या प्रतिमेला तडा गेला असंही वक्तव्य फडणवीसांनी केलं. ‘अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय हा चुकीचा होता. पण त्याच आता पश्चाताप होत नाही. ज्यावेळी पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत रहावं लागतं. तुम्ही राजकारणात मेलात तर तुम्हाला उत्तर देणं शक्य नाही.’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाहीतर, ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यावेळी मनात खूप राग आणि भावना होत्या. त्यामुळे आम्ही अजित पवारांसोबत गेलो. परंतु ते चुकीचं होतं आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सत्ता स्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितलं. त्याचवेळी आमच्या मनात पाल चुकचुकली. त्यामुळे आम्ही भल्या पहाटे शपथविधी उरकून घेतला. पण ते फासे नीट पडले नाहीत आणि सरकार गेलं असंही फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here