पुणे: महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कुरबुरी असल्याची चर्चा असतानाच आगामी स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसनं केली आहे. विधानसभा निवडणुकांना बराच अवधी असताना काँग्रेसनं केलेल्या या तयारी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे खासदार यांनी आज यावर प्रतिक्रिया दिली आहे. ( Taunts Congress Leader )

पुण्यात पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी विविध राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली. ‘साम टीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल, असं म्हटलं होतं. मागील वेळेस राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती. २०२४ च्या निवडणुकीनंतर आमचा पक्ष पहिल्या क्रमांकावर असेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. काँग्रेस पक्ष स्वबळावर नरेंद्र मोदी व भाजपच्या सरकारचा पराभव करणार असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचा:

खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत सुरू असलेल्या वादावर त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं. ‘महाविकास आघाडीत एकमेकांशी समन्वय हवा. एकमेकांना त्रास होईल, संघटनात्मक घोळ होईल असे विषय टाळले पाहिजेत. मात्र, स्थानिक पातळीवर अनेकदा वाद होत असतात. ते वादाचे विषय समन्वय समितीमध्ये आले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे,’ असं ते म्हणाले.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे:

  • पत्रकाराना फ्रंट लाईन वर्कर दर्जा द्यावा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार
  • मुंबई, नाशिक, संभाजीनगर व ठाणे येथे भगवाच फडकणार
  • पुणे महापालिकेत आम्ही किंग किंवा किंगमेकर नक्की असणार
  • महाविकास आघाडी म्हणून लढल्यास पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना ८० जागांवर दावा सांगणार.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here