वाशिम: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार इथं समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा वाशिम शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या विरोधात ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकावरच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. (Police Inspector Booked for Raping lady police constable In )

वाचा:

विश्वकांत गुट्टे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. वाशिमच्या मालेगाव पोलीस ठाण्यात २००७ मध्ये विश्वकांत गुट्टे हे पीएसआय या पदावर कार्यरत असताना त्यांची पीडित पोलीस महिलेशी ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत ३० मे २०२१ रोजी वाशिममध्ये आरोपी गुट्टे पीडितेच्या घरी गेले आणि त्यांनी जबरदस्ती करीत बलात्कार करून मारहाण केली, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. या प्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वाचा:

आरोपी विश्वकांत गुट्टे जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यावर ३७६ सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास वाशीम शहर पोलीस करीत आहेत. महिला पोलिसासोबत अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर सर्वसामान्यांचे काय? सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी असलेल्या महिला पोलीसच असुरक्षित असतील तर सामान्य महिलांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न विचारला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here