अहमदनगर: तालुक्यात विक्रीसाठी आणण्यात आलेले सहा टन वाटाण्याचे बोगस बियाणे कृषी विभागाच्या पथकाने पकडले आहे. यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून हे बियाणे विक्रीसाठी आणणाऱ्या वापाऱ्याचा अद्याप तपास लागलेला नाही. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पारनेमधील डॉ. आंबेडकर चौकात उत्तर प्रदेश राज्यातील एक ट्रक उभा असून त्यामध्ये संशयास्पद बियाणे असल्याची माहिती कृषी विभागाच्या बियाणे निरीक्षक पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन खात्री केली असता यूपी ९२ टी ८१४९ या क्रमांकाचा ट्रक तेथे उभा असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ट्रकमध्ये पटेल सिडस् कॉर्पोरेशन, जालौन, उत्तरप्रदेश या कंपनीचे ६ टन बनावट वाटाण्याचे बियाणे आढळून आले. ४० किलो वजनाच्या १५० बॅग असलेल्या वाटाण्याची किंमत ६ लाख रुपये इतकी आहे. मात्र हे बियाणे प्रमाणित नसल्याचे आढळून आले. पथकातील अधिकाऱ्यांनी ट्रकचालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकाने ट्रक ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेला.

वाचा:

कृषी अधीक्षक कार्यालयातील गुणनियंत्रक किरण गुलाबराव मांडगे यांनी यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला. त्यातील २ गोण्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या. बाकीच्या गोण्या कृषी विभागाने जप्त केल्या आहेत. मालकाची माहिती न मिळाल्याने ट्रकचालकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
बियाण्यांचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी कृषी विभागामार्फत बियाणे निरीक्षकांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मांडगे यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाळीबा नाथू उघडे, तालुका कृषी अधिकारी विलास रावजी गायकवाड यांचा या पथकात समावेश आहे. त्यांनी ही कारवाई केली.

वाचा:

ट्रक पकडण्यात आला असला तरी त्याचे गूढ पूर्णत: उकललेले नाही. हे बियाणे पारनेरमध्ये कोणी मागविले होते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ट्रकचालक लपवाछपवी करीत असल्याने त्याला मोठे पाठबळ असल्याचा आणि नियोजनबद्ध साखळी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिस आणि कृषी विभागाने याच्या खोलात जाऊन तपास करावा आणि संभाव्य घटना टाळाव्यात, अशी मागणी होत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here