वाचा:
आदर्शगाव हिवरे बाजारचा पॅटर्न येण्याआधीच संगमनेर तालुक्यात थोरात यांच्या नेतृत्वाखाली गावोगावच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू केल्याचे सांगण्यात येते. प्रशासन आणि गावकऱ्यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात आली. आता करोनामुक्त गाव स्पर्धेतही ही गावे सहभागी होणार आहेत. संगमनेर तालुक्याचा विस्तार तुलनेत मोठा आहे. देवकौठे ते बोटा असा १०० किलोमीटरचा विस्तार असलेल्या संगमनेर तालुक्यात १७१ गावे व २६३ वाड्या-वस्त्या आहेत. पुणे व नाशिक या शहरांशी जवळीक व जादा दळणवळण यासह संगमनेरमध्ये असलेली चांगली वैद्यकीय सुविधा यामुळे संगमनेर शहरात कोपरगाव, राहाता, जुन्नर, पारनेर, अकोले, सिन्नर या तालुक्यांमधून अनेक नागरिक उपचारांसाठी संगमनेरात येत असत.
वाचा:
पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीचा अनुभव लक्षात घेऊन कामाला सुरुवात झाली. संगमनेर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक चाचण्या झाल्या. घरोघर नागरिकांची तपासणी करण्यात आली. गावागावात ग्राम आरोग्य रक्षक दलातील युवकांनी काम करून काही लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण केले. विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे करून नागरिकांना चांगल्या उपचार सुविधा दिल्या. गावोगावी करोनाविरुद्ध लढ्याचे मॉडेल राबविण्यात आले. महसूल मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालय व कॉटेज हॉस्पिटलसाठी रुग्णवाहिका, अन्य यंत्रणा मिळाली. एवढेच नव्हे तर तालुकास्तरावराच पहिली आरटीपीसीआर चाचण्यांची प्रयोगशाळाही संगमनेरला सुरू झाली. त्यामुळे चाचण्यांना आणि त्यांचे निष्कर्ष वेळेवर येण्यास वेग आला. सततच्या पाठपुराव्यामुळे गावकऱ्यांनी मनावर घेतले. मंत्री थोरात यांनी गावोगावी भेटी दिल्या. ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यामुळे ६३ गावे करोनामुक्त झाली आणि २९ करोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. यामध्ये अनेक मोठ्या गावांचाही समावेश आहे. दुर्गम भागातही करोना पोहोचला होता. ती गावेही आता करोनामुक्त होत आहेत. उरलेल्या गावांत करोना रुग्णांची संख्या घटली आहे. आज तालुक्यात ८८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
वाचा:
या कामात थोरात यांच्यासह आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, इंद्रजित थोरात यांनीही लक्ष घातले. याशिवाय तालुक्याचे महसूल आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनीही परिश्रम घेतले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times